साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. अभिनेत्री 'गुड बाय' चित्रपटातून हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे.
आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात रश्मिका मंदाना अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटात ती बिग बींच्या लेकीची भूमिका साकारत आहे.
दरम्यान अभिनेत्री सतत विविध माध्यमांना मुलाखती देताना दिसून येत आहे. या मुलाखतींमध्ये ती आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत रंजक खुलासे करत आहे.
अभिनेत्रीने नुकतंच एका माध्यमाला मुलाखत दिली होती. मुलाखतीत रश्मिकाने आपल्या आवडत्या अभिनेत्रींबाबत सांगितलं आहे.
रश्मिकाला साऊथ सुंदरी समंथा प्रभू प्रचंड आवडते. तिच्यासोबत काम करण्याची तिची इच्छा आहे. समंथासोबत आपलं चांगलं बॉन्डिंग असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.
तसेच आपल्या प्रत्येक गोष्टीत समंथा नेहमी आपल्या सोबत उभी राहत असल्याचंही रश्मिकाने सांगितलं. अभिनेत्रीने समंथा आपल्याला एखाद्या सुंदर बाहुलीसारखं भासत असल्याचा खुलासादेखील केला आहे.
तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा आपल्याला प्रचंड आवडत असल्याचं तिने सांगितलं. तिच्या कामाने इतरांप्रमाणे आपणही प्रभावित असल्याचं रश्मिकाने उघड केलं आहे.
इतकंच नव्हे तर समंथा आणि आलियासोबत आपल्याला रोड ट्रिपवर जायची इच्छा असल्याचं रश्मिकाने म्हटलं आहे.