NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाने केला खाजगी आयुष्यातील 'त्या' गोष्टींबाबत खुलासा, वाचून सर्वच चकित

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाने केला खाजगी आयुष्यातील 'त्या' गोष्टींबाबत खुलासा, वाचून सर्वच चकित

Rashmika Mandanna News: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.

18

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.

28

काही दिवसांपूर्वी रश्मिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बाय' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'मध्ये झळकणार आहे.

38

तत्पूर्वी अभिनेत्रीने एका मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबाबत काही खुलासे करत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.

48

नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने सांगितलं की, ती घरातील सर्व सदस्यांसोबत घरात काम करणाऱ्या सर्व्हंटच्यादेखील पाया पडते.

58

यावेळी बोलताना अभिनेत्रीने सांगितलं की, मी बाहेरून घरी परतल्यानंतर सर्वात आधी माझ्या आई वडिलांच्या आणि घरात असणाऱ्या मदतनिसांच्यापण पाया पडते.

68

कारण मला वाटतं आपण कोणासोबत भेदभाव करु नये. सर्वांचं आशीर्वाद आपल्याला चांगलं आयुष्य देतो. आशीर्वाद कोणाकडूनही मिळो तो चांगलाच असतो. त्यामुळे मी प्रत्येकांचा आशीर्वाद घेत असते.

78

अभिनेत्रीने सांगितलं की, ती सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी आपल्या पेट्ससोबत वेळ घालवते. त्यानंतर आपल्या मित्रांना जाऊन भेटते.

88

रश्मिकाच्या मते या गोष्टी तिला सर्वात जास्त आनंद देतात.

  • FIRST PUBLISHED :