बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या आपल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. आपल्या या बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूटमुळे रणवीर अडचणीत सापडला आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्याविरुद्ध पोलिसांत तक्रारदेखील दाखल झाली आहे.
नेहमीच अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरला आपलं न्यूड फोटोशूट महाग पडल्याचं दिसत आहे. मात्र अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हे फोटोशूट नेमकं कुठे झालं? आणि कुणी केलं? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
वास्तविक रणवीर सिंहने हे फोटोशूट प्रसिद्ध 'पेपर' या मॅगझीनसाठी केलं होतं.
प्रसिद्ध फोटोग्राफर आशिष शाह यांनी रणवीरचं न्यूड फोटोशूट केलं आहे.
अनेकांना वाटत असेल की हे शूट विदेशात झालं असेल. परंतु हे फोटोशूट मुंबईतील लोकप्रिय मेहबूब स्टुडिओमध्ये झालं आहे. या फोटोशूटसाठी तब्बल तीन तासांचा वेळ लागला होता.
इ टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आशिष शाह यांनी या सर्व गोष्टींबाबत माहिती दिली आहे.
आशिष यांनी या मॅगझीनसाठी किम कर्दाशियनसोबतसुद्धा काम केलं आहे. परंतु रणवीरसोबत काम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
परंतु वास्तविक रणवीर सिंहच्या या फोटोशूट मुळे प्रचंड खळबळ माजली आहे. अभिनेत्याला अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे.