बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या आपल्या 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस मिस नॉर्वे'मुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. (सर्व फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
दमदार अभिनयाने, आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि निरागस हास्याने राणीने बॉलिवूडवर राज्य केलं आहे.
राणी मुखर्जीच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायचं असतं. मात्र अभिनेत्री नेहमीच आपलं कौटुंबिक आयुष्य लाइमलाईटपासून दूर ठेवते.
दरम्यान राणी मुखर्जीची एक जुनी मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. यामध्ये अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीवर भाष्य केलं आहे.
या मुलाखतीत राणीने सांगितलं होतं की, तिला खऱ्या आयुष्यात दोन मुलांची आई व्हायचं होतं. तिला आणखी एका अपत्याची इच्छा होती.
परंतु आपलं हे स्वप्न आता अपूर्णच राहिल्याचं तिने म्हटलं होतं.
याबाबत बोलताना राणीने म्हटलेलं की, त्यांना याआधीच दुसऱ्या प्रेग्नेंसीची प्लॅनिंग करायला हवी होती. मात्र आता उशीर झाला आहे. आपलं वय निघून गेल्याच राणी म्हणते.
राणीची मुलगी आदिरा आता नऊ ते दहा वर्षांची झाली आहे.