बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने अनेक वर्षानंतर 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने मंत्रमुग्ध केलं आहे.लोक तिच्या अभिनयाचे चाहते आहेत.
पडद्यावर विविध भूमिका साकारणारी ही सुंदर खाजगी आयुष्यात लग्जरी लाईफ जगते.राणीकडे आलिशान गाड्यांचं जबरदस्त कलेक्शन आहे. ती कोट्यावधीं रुपयांच्या घराची मालकीण आहे. राणी मुखर्जीच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
राणी मुखर्जीने 'राजा की आयेगी बारात' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. तेव्हापासून आजतागायत ही अभिनेत्री प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आदित्य चोप्राशी लग्न केल्यानंतर ती काही प्रमाणात पडद्यापासून दूर गेली होती. परंतु तरीही तिच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. तसेच अभिनेत्री पडद्यापासून दूर राहूनही थाटामाटात आपलं आयुष्य जगत आहे.
राणी मुखर्जीने प्रसिद्धीसोबतच अफाट संपत्तीही कमावली आहे. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. अभिनेत्री बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत गणली जाते.
राणी मुखर्जी चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. ती एका मुलीची आईदेखील आहे. तिच्या मुलीचं नाव आदिरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री मुंबईत राहात असलेल्या आलिशान घराची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीने मुंबईतील एका पॉश भागात सुमारे 7 कोटींचं आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
राणी मुखर्जीला लग्जरी गाड्यांचीदेखील आवड आहे. त्यामुळेच तिचं कार कलेक्शनही जबरदस्त आहे. अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज एस क्लास आणि ऑडी ए8 डब्ल्यू 12 सारख्या महागड्या कार आहेत.
राणी मुखर्जी सध्या 45 वर्षांची आहे. अभिनेत्रीने चित्रपट आणि जाहिरातींमधून प्रचंड कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीकडे 13 मिलियन डॉलरची संपत्ती आहे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर राणी जवळजवळ 100 कोटी रुपयांची मालकीण आहे.