NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 25 मुलींच्या ऑडिशननंतर दीपिका झाली रामायणाची सीता, अशी झाली होती निवड

25 मुलींच्या ऑडिशननंतर दीपिका झाली रामायणाची सीता, अशी झाली होती निवड

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या रामायणासाठी झालेल्या निवडीचा किस्सा. दीपिका यांनी रामायणात सीतेची भूमिका साकारली आहे.

19

रामानंद सागर यांचा रामायण हा टीव्ही शो त्यापैकी एक आहे. ज्यांनी इतिहास रचला. एकेकाळी सुपरहिट झालेला या शोची क्रेझ अद्याप कायम आहे. यातील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी कहाणी आहे. यापैकीच एक आहे अभिनेत्री दीपिका चिखलिया हिची रामायणासाठी झालेल्या निवडीचा किस्सा. दीपिका यांनी रामायणात सीतेची भूमिका साकारली आहे.

29

रामायणसाठी निवड होण्यापूर्वी दीपिका यांनी बऱ्याच जाहिरातींमध्ये कामा केलं होतं. याशिवाय त्यांनी ‘विक्रम वेताळ’ या मालिकेत राणीची भूमिका साकारली होती.

39

रामायणच्या निर्मितीपूर्वीच दीपिका ही रामानंद सागर यांच्या आवडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. त्यांना स्वतःची वेगळी ओळख तर मिळाली होती. ज्यामुळे त्यांना बरीच कामं मिळत होती. मात्र आतापर्यंत त्यांना अशी भूमिका मिळाली नव्हती. ज्यामुळे त्यांचं नशिबच नाही तर लाइफ सुद्धा सावरेल.

49

दीपिका यांच्याकडे स्पष्टपणे डायलॉग बोलण्याची क्षमता तर होतीच पण यासोबत त्यांच्याकडे असा सुंदर आणि निरागस चेहरा होता. जो देवीची प्रतिमा टीव्हीवर दाखवू शकेल.

59

एका मुलाखतीत दीपिका यांनी सांगितलं, जेव्हा आमच्या स्क्रिनप्ले रायटरनं मला सांगितलं की, रामानंद सागर रामायण तयार करत आहेत आणि मला यासाठी ऑडिशन द्यायला हवी त्यावेळी मी तिथे गेले.

69

रामानंद सागर यांनी दीपिका यांना स्पष्ट सांगितलं होतं, वेशभूषा आणि डायलॉगमध्ये जोपर्यंत मला एखादी मुलगी सीतेच्या भूमिकेसाठी परफेक्ट वाटणार नाही तोपर्यंत मी कास्ट करणार नाही.

79

दीपिका यांच्यासोबत त्या ठिकाणी त्यावेळी 20-25 मुली होत्या ज्या ऑडिशनसाठी आल्या होत्या. रामानंद यांनी डायलॉगची 4-4 पानं दिली होती. ज्याची प्रॅक्टिस करायची होती. दीपिका यांनी डायलॉग तर म्हटले पण खरी कसोटी त्यानंतर होती.

89

दीपिका सांगतात, रामानंद सागर कॅमेराच्या मागून डायलॉग बोलत होते आणि त्यांनी मला समोरुन चालत यायला सांगितलं. ते म्हणाले, आता असं चालत या की राम वनवासासाठी जात आहेत.

99

रामानंद सागर यांनी प्रत्येक गोष्टीची मॉक टेस्ट केली. जेव्हा या सर्व टेस्ट संपल्या त्यावेळी अचानक रामानंद सागर यांनी सांगितलं की, दीपिका रामायणची सीता असेल. (संकलन : मेघा जेठे.)

  • FIRST PUBLISHED :