'राधे श्याम' चित्रपटात पूजा हेगडेनं प्रभाससोबत बोल्ड सीन शूट केले असून दोघांच्या इंटिमेट सीनचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.
राधे श्यामच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे, विक्रमची भूमिका करणारा प्रभास पूजाला आवडतो. परंतु प्रेमावर विश्वास ठेवण्याऐवजी तो फ्लर्टिंगबद्दल बोलतो. आणि नंतर या दोघांची लव्हस्टोरी फुलते.
या चित्रपटात पूजा हेगडे आणि प्रभास यांची लव्हस्टोरी एका भव्य ठिकाणावर सुरु होते.
चित्रपटात प्रेरणा-विक्रम म्हणजेच प्रभास आणि पूजा एकमेकांसोबत किसिंग सीन मोजतात त्यावेळी ९७ किसिंग सीन असल्याचं समजतं. मात्र, हा चित्रपटाचा केवळ एक संवाद आहे, हे राधे श्याम पाहिल्यानंतरच कळेल, यात किती किसिंग सीन आहेत.
राधे श्याम या चित्रपटातून पूजा आणि प्रभास पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांची लव्ह केमिस्ट्री चाहत्यांना आकर्षित करून घेत आहे.
प्रभास-पूजाचे रोमँटिक सीन पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पसंत पडत आहे.