दाक्षिणात्या सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) चा स्वॅग सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. कारणही तसंच आहे...त्याचा नुकताच 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील गाणी असो किंवा डायलॉक सगळ्यांची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. सगळीकडे अल्लू अर्जुनची नादखुळ्या स्टाईलची चर्चा आहे. या नादखुळ्या स्टारची बायको स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील मागे टाकते.
अल्लू अर्जुनने 6 मार्च 2016 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांना दोन मुलं आहेत. सोशल मीडियावर दोघेही मुलांसोबत फोटो शेअर करत असतात.
अल्लू अर्जुनने बायको दिसायला खूपच सुंदर आहे. नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते.
बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल असेच काहीचे स्नेहाचे सौंदर्य आहे.
अल्लू अर्जुनची बायको दिसायला सुंदर तर आहेच शिवाय ती तितकीच हुशार आणि बुद्धीमान देखील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आणि स्नेहाची भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती.
अल्लू अर्जुनची बायको स्नेहा रेड्डीनं अमेरिकेतून शिक्षण पूर्ण केलं आहे.
तिचे वडील हैद्राबादमधील एक मोठे उद्योगपती आहेत.
स्नेहा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
कम्प्युटर सायन्समची स्नेहाने पदवी घेतली आहे.
सुंदरतेच्या बाबतीत स्नेहा मॉडेल असेल किंवा अभिनेत्री या सर्वांना मात देताना दिसते. सोशल मीडियावर तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. . (सर्व फोटो साभार-Sneha Reddy इन्स्टा)