NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल थक्क!

'या' आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल थक्क!

संपत्तीच्या बाबतीतही अभिनेत्री अभिनेत्यांपेक्षा कमी नाहीत. पाहूयात कोण आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री...

  • -MIN READ

    Last Updated: October 19, 2019, 08:03 IST
18

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री या अभिनेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यात तेवढीच स्पर्धा सुद्धा आहे. पण संपत्तीच्या बाबतीतही अभिनेत्री अभिनेत्यांपेक्षा कमी नाहीत. पाहूयात कोण आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री...

28

ऐश्वर्या राय- बच्चन- या शर्यतीत सर्वात पहिलं नाव येतं ते ऐश्वर्या रायचं. ऐश्वर्या सध्या सिनेमांमध्ये कमी दिसत असली तरी तिच्या मालमत्तेवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. ऐश्वर्याची स्वतःची जवळपास ३५ दशलक्ष डॉलरहून जास्त संपत्ती आहे.

38

अमिषा पटेल- गदर एक प्रेम कथा या सिनेमातून आपल्या जबरदस्त अभिनयाने घराघरात पोहोचलेली अमिषा गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमात दिसली नाही. पण तिची मालमत्ता पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. अमिषाकडे जवळपास ३० दशलक्ष डॉलरहून जास्तीची संपत्ती आहे.

48

अमृता राव- या शर्यतीत तिसरं नाव येतं ती अमृता रावचं. अमृताचं बॉलिवूड करिअर फारसं चांगलं राहिलेलं नाही. यानंतर तिने तेलगू सिनेमांकडे मोर्चा वळवला. अमृताकडे जवळपास २० दशलक्ष डॉलरहून जास्त संपत्ती आहे.

58

काजोल- आजही काजोलचे दमदार अभिनय असलेले सिनेमे तिचे चाहते आवर्जुन पाहतात. काजोलची एकूण संपत्ती जवळपास १८ दशलक्ष डॉलर एवढी आहे.

68

इलियाना डिक्रूज- दाक्षिणात्य सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतलेली इलियानाच्या नावावर अनेक चांगले सिनेमे आहेत. आतापर्यंत इलियानाची एकूण संपत्ती १५ दशलक्ष डॉलर एवढी आहे.

78

करिश्मा कपूर- ९० च्या दशकातील हिट अभिनेत्री करिश्माचं बॉलिवूड करिअर तुफान चाललं. एकेकाळची टॉपची अभिनेत्री म्हणून तिचं नाव घेतलं जायचं. करिश्माची एकूण संपत्ती १२ दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे.

88

प्रियांका चोप्रा- बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलेल्या प्रियांकाची एकूण संपत्ती २८ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे.

  • FIRST PUBLISHED :