मराठी कलाविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकतंच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा 2022 पार पडला. या सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
प्रवाह पिक्चर पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष. मराठी सिनेमे, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या चमकदार कामगिरीची दखल घेणारा हा सोहळा लवकरच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटपासून ते सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ अश्या विभागांमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपोवित, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ छायाचित्रकार महेश आणे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्रीकांत बोजेवार यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षणाची धुरा सांभाळली आहे.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफपासून ते आत्ताचा हॅन्ड्सम हंक भूषण प्रधानपर्यंत सर्वच लोक उपस्थित होते.
सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांच्या लुक आणि स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
या सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. सध्या हे फोटो प्रचंड चर्चेत आहेत.
प्रवाह पिक्चर वाहिनीवर लवकरच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे.