मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. अभिनयाशिवाय प्रसाद ओक दिग्दर्शनातही उत्तम कामगिरी करत आहे.
नुकताच त्याचा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती.
प्रसाद ओक नव्या भूमिकेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
प्नसाद ओकने नवीन वर्षात गुडन्यूज शेअर केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसादने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव 'तोच मी.. प्रभाकर पणशीकर' असं आहे.
प्रसाद पुन्हा एकदा नवा बायोपिक घेऊन येत आहे. लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हा बायोपिक करणार आहे.
प्रसाद ओकने पोस्ट शेअर करत लिहिलं, 'नवं वर्ष, नवं स्वप्न, सोबत जुनेच मित्र कलावंत, आणि आशीर्वाद देणारे आहेत पंत'.
धर्मवीरनंतर आता मराठीतील दिग्गज अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या बायोपिकमध्ये प्रसाद ओक झळकणार आहे.