बिग बॉस मराठी 4 च्या घरातून प्रसाद जवादेची एक्झिट झाली.
प्रसादचा बिग बॉसचा प्रवास आज संपला. त्याच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.
प्रसादला घराच्या बाहेर जावं लागणार ऐकताच त्याचे डोळे पाणावले. इतर स्पर्धकही भावूक झाल्याचं पहायला मिळाले.
घराबाहेर पडाताना प्रसादने सगळ्या स्पर्धकांची माफी मागितली आणि या घरातील भांडणे या घरापुरतीच मर्यादित ठेवूयात म्हटलं.
प्रसाद पहिल्या दिवसापासूनच अतिशय उत्तमरित्या खेळला आहे.
प्रसादने त्याच्या वेगळ्या स्वभावामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
प्रसादच्या बाहेर येण्यामुळे त्याचे चाहतेही खूप दुःखी झाले आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत.