मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्राजक्ता माळीला ओळखलं जातं.
छोटा पडदा गाजवल्यानंतर आता प्राजक्ता मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे.
प्राजक्ता माळी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रँडमुळे प्रचंड चर्चेत आहे.
दरम्यान आता अभिनेत्रीने आपल्या खाजगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळीच्या लव्ह लाईफबाबत तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.
नुकतंच प्राजक्ता माळीने आपल्या रिलेशनशिपबाबत एक गुपित उघड केलं आहे.
राजश्री मराठीच्या एका मुलाखतीत प्राजक्ता माळीसोबत एक सेगमेंट करण्यात आलं होतं.
यामध्ये तिला तिच्या शेवटच्या गोष्टींबाबत विचारण्यात आलं होतं. याचाच एक भाग म्हणून तिला तू शेवटचं डेट कधी केलं आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाचं उत्तर देत प्राजक्ता म्हणाली मी साडे चार वर्षांपूर्वी शेवटचं डेट केलं आहे.