मालिका, सिनेमा, वेब सीरिज, सूत्रसंचालन, इतकंच नव्हे तर कविता या गोष्टींमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो आणि व्हिडीओंनी ती चाहत्यांना नेहमीच भुरळ घालताना दिसते.
प्राजक्तानं नवं फोटोशूट केलं असून हे नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
नव्या फोटोशूटमध्ये प्राजक्ताचा मराठी साज पहायला मिळत आहे.
फोटोसोबत प्राजक्तानं लक्षवेधी कॅप्शनही दिलंय.
प्राजक्तानं फोटो शेअर करत म्हटलं, 'सिंहिण, जंगलाची राणी. तुम्ही तिच्याशी तसंच वागणं चांगलं राहिलं'.
तिच्या या पोस्टवर सध्या अनेक कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ता फॅशनच्याबाबतीत नवनवीन प्रयोग करताना कायम दिसून येते. त्यामुळे तिच्या लुकसाठी चाहते फार उत्सुक असतात.