'व्वा दादा व्वा' या एका वाक्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या प्रेमात पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चाहत्यांमध्ये तिची मोठी क्रेझ पहायला मिळते.
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून कायमच निरनिराळे फोटोशूट शेअर करत असते.
नुकतंच प्राजक्तानं नवं फोटोशूट केलं असून हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्राजक्ताने वन साईड ऑफ शोल्डर टॉपमध्ये लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ताच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांचा नजरा खिळल्या असून फोटोंवर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.
तुझ्यासमोर बाकी सगळे फेल, आमची गुटगुटीत प्राजक्ता कुठे नेऊन ठेवली, झकास, खूप छान दिसतेय, अशा अनेक कमेंट प्राजक्ताच्या फोटोंवर येत आहेत.
काही वेळातच प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.