पूजा बत्रा ही 90 च्या दशकात बॉलिवूडमधील एक आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची.
जोडी नंबर वन, नायक, हसिना मान जायेगी, फर्ज, विरासत यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये जवळपास एक दशक गाजवलं.
गेल्या काही काळात ती बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र चित्रपटांपासून दूर असलेली पूजा आजही तितकीच चर्चेत असते.
तिनं स्पेस एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. इलॉन मस्क यांना रिअल लाईफ आयर्नमॅन असेही म्हणतात.
इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. एका पार्टीत त्यांची पूजासोबत भेट झाली होती. चाळीशी पार केलेल्या पूजाचं सौंदर्य पाहून ते देखील अवाक झाले.
पूजानं या पार्टीत इलॉन मस्क यांच्या आईसोबत देखील काही फोटो काढले. अन् आश्चर्याची बाब म्हणजे हे फोटो स्वत: इलॉन मस्कनं काढले होते. पूजानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.