बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन मोठ्या ब्रेकनंतर साऊथ चित्रपटातून पडद्यावर परतली आहे. नुकतंच मणिरत्नम यांचा 'पोन्नीयिन सेल्व्हन' चित्रपट रिलीज झाला आहे. या 500 कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटामध्ये अनेक मोठमोठे कलाकार झळकले आहेत. आता या कलाकारांचं मानधन समोर आलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर मणिरत्नम यांच्यासोबत काम केलं आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत झळकली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी तिला 10 कोटी इतकं मानधन मिळालं आहे.
या चित्रपटात चियान विक्रम मुख्य भूमिकेत आहे. तो साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांनापैकी एक आहे. या चित्रपटासाठी त्याला 12 कोटी इतकं मानधन मिळालं आहे.
जयम रवी हासुद्धा साऊथमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला या चित्रपटात ऐश्वर्या इतकंच म्हणजे 8 कोटींचं मानधन मिळालं आहे.
अभिनेता कार्थीसुद्धा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. त्याने या चित्रपटासाठी 5 कोटी रुपये घेतले आहेत.
शोभिता धूलिपाला या लोकप्रिय अभिनेत्रीला 2.5 कोटी इतकी रक्कम मिळाली आहे.
प्रकाश राज यांना या चित्रपटासाठी 1 कोटी रुपये मिळाले आहेत.
अभिनेत्री तृषा कृष्णनला या चित्रपटासाठी 2 कोटी मिळाले आहेत.