बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते पियुष मिश्रा यांनी नुकतंच आपल्या एका मुलाखतीत आपल्या ऑटोबायोग्राफीबाबत संवाद साधला.
पियुष मिश्रा यांनी 'तुम्हारी औकात क्या है..पियुष मिश्रा' अशी आपली ऑटोबायोग्राफी प्रकाशित केली आहे.
या संदर्भात बोलताना त्यांनी आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर मोकळेपणाने संवाद साधला.
आपल्या खाजगी आयुष्याबाबत बोलताना त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
पियुष मिश्रा यांनी सांगितलं की, इयत्ता सातवीच्या वर्गात असताना त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं.
धक्कादायक म्हणजे एका नात्यातील महिलेनेच त्यांच्यासोबत हे लाजिरवाणं कृत्य केलं होतं.
या घटनेने आपण हादरून घेल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अनेक वर्षे लागल्याचं त्यांनी उघड केलं आहे.
आज ५० वर्षानंतरही ती घटना आठवून आपल्याला अस्वस्थ होत असल्याचं पियुष म्हणाले. या काळात स्वतः ला सावरण्यासाठी आपल्या कलेचा मोठा उपयोग झाल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
दिल से, रॉकस्टार, आजा नचले, पिंक, टशन, तमाशा, गँग्स ऑफ वासेपूर अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.