NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / वादग्रस्त अभिनेत्रीने घेतला आठवलेंच्या RPI चा झेंडा; अनुराग कश्यपवर आरोपांनंतर पक्षप्रवेश

वादग्रस्त अभिनेत्रीने घेतला आठवलेंच्या RPI चा झेंडा; अनुराग कश्यपवर आरोपांनंतर पक्षप्रवेश

अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) रामदास आठवलेंच्या (ramdas athawale) RPI मध्ये प्रवेश करताच तिच्याकडे महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

111

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषची आता राजकारणात एन्ट्री झाली आहे. पायलने  RPI चा झेंडा हाती घेतला आहे. (फोटो सौजन्य - एएनआय)

211

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत तिनं पक्ष प्रवेश केला आहे. तिला महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य - एएनआय)

311

पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. 

411

2014-15 साली अनुराग कश्यपला आपण भेटलो त्यावेळी दारूच्या नशेत त्याने आपल्यासह जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचं पायल म्हणाली.

511

अनुराग कश्यपविरोधात आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी तिला पाठिंबा दिला होता.

611

अनुराग कश्यपवर आरोप लावणारी पायल घोष स्वत:ही अडचणीत सापडली होती. अनुरागवर आरोप करताना तिनं अभिनेत्री ऋचा चड्ढाचाही उल्लेख केला होता. ऋचाने पायलविरोधात कोर्टात याचिका दाखल करत अब्रुनुकसानाची दावा ठोकला. त्यानंतर पायलने तिची माफी मागितली.

711

पायल घोषने हिंदी सिनेमासह दाक्षिणात्य आणि पंजाबी फिल्ममध्येही काम केलं आहे. परेश रावल आणि ऋषी कपूर यांच्यासारख्या स्टारसह तिनं काम केलं आहे.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

811

पायल घोषने 2017 साली आलेली पटेल की पंजाबी शादी या फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये ऋषी कपूर आणि परेश रावल यांच्यासह ती मुख्य भूमिकेत होती.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

911

पायलने एक कॅनेडियन फिल्मही केली आहे. यामध्ये तिनं एका शालेय मुलीची भूमिका केली, जिला तिच्या शेजाऱ्यांच्या नोकरासह प्रेम होतं.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

1011

अनुराग कश्यपवर आरोप केल्यानंतर पायल घोष सर्वात जास्त चर्चेत आली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

1111

आता तर पायलने पक्षप्रवेश करून राजकारणातही एन्ट्री घेतली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)

  • FIRST PUBLISHED :