अभिनेता कैलाश वाघमारेनं नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्याच्या लेकीच्या नामकरण सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामध्ये कैलाश आणि पत्नी मीनाक्षी राठोड पारंपरिक अंदाजात सुंदर दिसत आहेत.
लेकीला जन्म देण्यापूर्वी मीनाक्षी राठोड 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत झळकली होती.
काही महिन्यांपूर्वी मीनाक्षीनं गोंडस लेकीला जन्म दिला आहे. मीनाक्षी आणि कैलाश सतत सोशल मीडियावर आपल्या लेकीचे फोटो शेअर करत असतात.
नामकरण सोहळ्यामध्ये कुटुंबातील मंडळी मजामस्ती करताना दिसून येत आहे.
मीनाक्षी आणि कैलाशने आपल्या लेकीचं नाव 'यारा' असं ठेवलं आहे. हे हटके नाव सध्या अनेकांना भुरळ घालत आहे.