बॉलिवूडचे लोकप्रिय दिवंगत दिग्दर्शक -निर्माता यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांचं निधन झालं आहे.
पामेला या अभिनेत्री नसल्या तर त्या सिने इंडस्ट्रीशी निगडित होत्या. त्या एक गायिका होत्या. शिवाय त्या लेखिका, डिझायनर आणि सह निर्मात्यासुद्धा होत्या.
पामेला यांना इंडस्ट्रीत सर्व लोक पॅम या नावाने ओळखत होते. सर्व सेलिब्रेटींसोबत त्यांचं छान नातं होतं.
पामेला यांनी यश चोप्रांना प्रत्येक सुख-दुःखात अतिशय ठामपणे साथ दिली होती.
या दोघांची पहिली भेट दिल्लीमध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.
यश चोप्रा एक परीक्षा देण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांची भेट झाली होती. पामेला या मूळच्या दिल्लीच्याच होत्या.
पुढे अनेक प्रयत्नांनंतर त्यांचं लग्न झालं होतं. या दोघांना आदित्य आणि उदय अशी दोन मुले आहेत.
पामेला यांनी खाजगी आयुष्यातच नव्हे तर यश चोप्रांच्या व्यावसायिक चढ-उतारांमध्येसुद्धा खंबीरपणे साथ दिली आहे.