अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं नातं माहिती नाही असं कुणीच नाही. या दोघांच्या प्रेमाची चर्चा आजही होत असते. यांची स्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चित लव्हस्टोरीपैकी एक आहे.
परंतु अफाट प्रेम असूनही हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. रेखांनी अनेकवेळा याची खंत व्यक्त केली आहे.
अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न करत संसार थाटला होता. ते आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत आहेत.
इकडे रेखा मात्र खऱ्या आयुष्यात अतिशय एकट्या पडल्या आहेत. त्यांचं आयुष्य अनेकांना रहस्यमयी वाटतं.
बच्चन कुटुंब रेखा यांच्यापासून नेहमीच दूर राहतं हे आपण अनेक कार्यक्रमांमध्ये पाहिलं आहे.
मात्र अमिताभ आणि जया यांची सून ऐश्वर्या रेखांवर नेहमीच प्रेम व्यक्त करताना दिसून आली आहे.
नुकतंच 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उदघाटन कार्यक्रमात रेखा सहभागी झाल्या होत्या. दरम्यान ऐश्वर्यासुद्धा आपली लेक आराध्यासोबत आली होती.
यावेळी रेखांनी आराध्यावर प्रेम व्यक्त करत तिला मिठी मारली आणि त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढले.