'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मुंबईत पार पडला. यामध्ये अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. परदेशी पाहुण्यांमध्ये पेनेलोप क्रूझ, टॉम हॉलंड, झेंडाया, गिगी हदीद आणि ख्रिश्चन लुबाउटिन यांचा समावेश होता.
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आपला मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानीसोबत दिसून आले.
हा कार्यक्रम अंबानी परिवाराने आयोजित केला होता. यावेळी मुकेश अंबानी आणि नीता अंबानीसह संपूर्ण कुटुंब एकत्र उपस्थित होते.
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्घाटन समारंभात अंबानी आणि पिरामल कुटुंब पारंपरिक वेशात फारच सुंदर दिसत होतं.
यावेळी लाल रंगाच्या लेहंग्यात ईशा अंबानी कमालीची सुंदर दिसत होती.
या कार्यक्रमात एक जोडी आकर्षक ठरली आणि ती म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची.
राधिका आणि अनंत या सोहळ्यासाठी फारच सुंदर ग्लॅमरस अंदाजात तयार झाले होते.
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होत्या.
या सोहळ्यात नीता अंबानी यांनी सुंदर असं मनोगत व्यक्त करत पारंपरिक नृत्यही सादर केलं.