साऊथची लेडी सुपरस्टार समजली जाणारी नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन, या वर्षी जूनमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
लग्नामुळे नयनतारा आणि शिवन प्रचंड चर्चेत आले होते. लग्नानंतरसुद्धा हे जोडपं सतत चर्चेत आहे.
नयनताराने हनीमून ट्रिपमधून अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं.
दरम्यान आज दिग्दर्शक विघ्नेश शिवन म्हणजेच नयनताराच्या पतीचा वाढदिवस आहे. विघ्नेश त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
दिग्दर्शकाने आपल्या वाढदिवसानिमित्त पत्नी नयनतारासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
दुबईच्या सर्वात उंच आणि सुंदर इमारत बुर्ज खलिफासोबत पोज देताना एक फोटो शेअर करत विघ्नेशने सुंदर कॅप्शन लिहलं आहे.
कॅप्शनमध्ये लिहलंय, 'माझा वाढदिवस त्या कुटुंबासोबत जो मला शुद्ध प्रेम देतो. माझी पत्नी आणि माझ्या प्रियजनांसोबत बुर्ज खलिफा जवळ एक ड्रीमी बर्थडे... यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही...मी देवाचे नेहमी आभार मानतो की त्याने मला या आयुष्यातील सर्व सुंदर क्षण दिले आहेत'.
या फोटोमध्ये विघ्नेश शिवन आपली आई आणि बहिणीसोबत दिसत आहे. यावरून नयनताराने आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कुटुंबासोबत सेलिब्रेशन केल्याचे दिसून येत आहे. तिच्या नवऱ्यासाठी हा एक सरप्राईज प्लॅन होता.