बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या घरगुती वादामुळे चर्चेत आहे.
परंतु याआधीही अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. इतकंच नव्हे तर अभिनेत्याने थेट इरफान खानशी पंगा घेत त्याच्या गर्लफ्रेंडलाच पटवल्याचं म्हटलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवंगत अभिनेता इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यामध्ये एका मुलीमुळे वाद निर्माण झाला होता.
असं म्हटलं जातं की, नवाजुद्दीनला इरफानची गर्लफ्रेंड आवडत होती. आणि अभिनेत्याने तिला डेट करायलाही सुरु केलेलं.
जेव्हा ही गोष्ट इरफानला समजली तेव्हा त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. परंतु इरफानने याबाबत कधीच कोणती प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
आता नवाजुद्दीनच्या भावाने ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत उघड करत सांगितलं आहे की, नवाजुद्दीन इरफानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता.
'लंच बॉक्स'च्या सेटवर या दोघांमध्ये पुन्हा एकदा वादही झाला होता. त्यामुळे शूटिंगचं वेळापत्रक कोलमडलं होतं.
या दोघांनी एकमेकांच्या अनुपस्थितीत आपलं शूटिंग पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.