NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'शेवंता'ने Navratri निमित्त धारण केलेल्या आठ देवींचे माहात्म्य काय आहे ?, पाहा Photos

'शेवंता'ने Navratri निमित्त धारण केलेल्या आठ देवींचे माहात्म्य काय आहे ?, पाहा Photos

शारदीय नवरात्रौत्सवाचे (Navratri 2021)औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar)गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रुपातील फोटो शेअर करत आहे. आज आपण तिचे या आठ दिवसातील देवीच्या रूपातील फोटो पाहणार आहे.

118

शारदीय नवरात्रौत्सवाचे (Navratri 2021)औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar)गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रुपातील फोटो शेअर करत आहे. आज आपण तिचे या आठ दिवसातील देवीच्या रूपातील फोटो पाहणार आहे.

218

पहिल्या दिवशी अपूर्वाने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप केले धारण

318

शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते. पहिला दिवशी फोटोशेअर करत तिने म्हटले की, कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते.

418

दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप केले धारण

518

दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप धारण केले होते. तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धरण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले होते.चौथ्या दिवशी अपूर्वाने जगदंबा मातेच्या रुपात पाहायला मिळली.

618

तिसऱ्या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण

718

अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले आहे. तिने पुढे म्हटले आहे की, जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे. अंबा परमेश्वरी,चामुनडेश्वरी,ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंध पुराणात याचा उल्लेख आहे.

818

चौथ्या दिवशी अपूर्वाने जगदंबा मातेचे रूप धारण केले

918

अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जगदंबा मातेचे रूप धारण केले होते.जगदंबा माता (राशीनची देवी) मंदिर,अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराच बांधकाम शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हलती दीपमाला हे या मंदिराच खास वैशिष्टय़ असल्याची माहिती देखील तिने दिली होती.

1018

पाचव्या दिवशी अपूर्वाने अपूर्वाने बंगाली देवीचे रुप केले धारण

1118

नवरात्रीचा पाचव्या दिवशी अपूर्वाने बंगाली देवीचे रुप धारण केले होते. 'बंगाली देवी त्रिनयन दुर्गामाता, त्रिपूरा अगरतला'' अशी कॅप्शन देत तिने देवीच्या रुपातील काही फोटो शेअर केले होते. अपूर्वाची ही कल्पना सर्वांना आवडलेली आहे. चाहते देखील तिच्या या कल्पनेचे कौतुक करत आहे. व ती उद्या कोणत्या देवीच्या रूपात दिसणार याची वाट पाहत असतात.

1218

साहाव्या दिवशी अपूर्वाने एकवीरा देवीचे रुप केले धारण

1318

नवरात्रीच्या साहाव्या दिवशी अपूर्वाने एकवीरा देवीचे रुप धारण केले होते व काही देवीच्या रूपातील तिचे फोटो शेअर केले होते. तिने इन्स्टा पोस्ट करत म्हटले होते की,लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.

1418

सातव्या दिवशी अपूर्वाने महाकाली देवीचे रुप केले धारण

1518

अपूर्वाने इन्स्टावर चंद्रपूरच्या महाकाली देवीचे रुप धारण केलेले तिचे काही फोटो शेअर करत म्हटले होते की, चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली हे गुफा मंदिर आहे.चंद्रपूर येथील महाकाली मंदिर गोंडकालीन असून याला वाकाटक कालाचाही संदर्भ आहे.महाकाली मंदिराच्या भिंतींवर शिल्पकलेहून तिबेटी आणि हिंदू परंपरेचे उत्कृष्ट मिश्रण दिसून येते.रंगीत चित्रकला हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

1618

आज आठव्या दिवशी देवी सरस्वतीच्या रुपातून अपूर्वा नेमळेकरने वेधलं आहे चाहत्यांचं लक्ष

1718

सरस्वती देवीच्या रुपातला फोटो शेअर करत अपूर्वाने म्हटले आहे की, "सरस्वती देवी, ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी आहे ; ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी वा श्रीपंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो."

1818

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीचे विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगताना दिसत आहे. तिने या दिवसात विविध देवींचे रूप धारण करत फोटोशूट केले आहे. तिच्या या कल्पनेला चाहत्यांची देखील पसंती मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :