ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या भारतात असून मागच्या काही दिवसांपासून तिचा आगामी सिनेमा द स्काय इज पिंकचं जोरदार प्रमोशन सुरु आहे.
सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कधी वेस्टर्न तर कधी साडीमध्ये दिसलेली प्रियांका काल देसी अवतारात चक्क गरबा गायिका फाल्गुनी पाठकच्या नवरात्री पंडालमध्ये पोहोचली.
यावेळी प्रियांका चोप्रासोबत 'द स्काय इज पिंक'मधील तिचा को स्टार रोहित सराफनं सुद्धा या गरबा नाइट्सला हजेरी लावली.
मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेली प्रियांका 'द स्काय इज पिंक'मधून पुनरागमन करत आहे. त्यामुळे ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडण्याच्या मूडमध्ये नाही.
फाल्गुनी पाठकच्या नवरात्री पंडालमध्ये पोहोचलेल्या प्रियांकानं या ठिकाणी फक्त सिनेमाचं प्रमोशनच केलं नाही तर या ठिकाणी तिनं फाल्गुनीच्या गाण्यांच्या तालावर गरब्याचा ठेकाही धरला.
प्रियांका 3 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. यापूर्वी आलेला 'गंगाजल' हा तिचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. मात्र त्यानंतर हॉलिवूडमध्ये मात्र तिनं चांगलाच जम बसवला.