बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही कलाकारांची लगीनघाई सुरुच आहे.
एकापाठोपाठ एक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत.
दरम्यान आता 'मुरांबा' फेम अभिनेता सुमित भोकसे लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं समोर आलं आहे.
इतकंच नव्हे तर अभिनेत्याने नुकतंच साखरपुडासुद्धा उरकला आहे.
सुमित भोकसेने आपली गर्लफ्रेंड मधुरा केळुस्करसोबत साखरपुडा उरकत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.
सुमितने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
या कार्यक्रमात अक्षया नाईकपासून ते प्रथमेश परबपर्यंत अनेक कलाकार उपस्थित होते.