मराठीतील अतिशय हुशार आणि गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखलं जातं. मुक्ता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
आजही अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये मुक्ता चहा आणि भजीचा आस्वाद घेताना दिसून येत आहे.
अभिनेत्रीने मान्सून स्पेशल पोस्ट शेअर करत एक छानसं कॅप्शनही दिलं आहे.
मुक्ताने या फोटोंना कॅप्शन देत लिहलंय, 'चहा आणि आपल्यामध्ये फक्त एक गोष्ट यायला हवी'. अर्थातच ती म्हणजे भजी.
मुक्ताच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि मजेशीर कमेंट्ससुद्धा करत आहेत.
मुक्ता अलीकडे आपल्या 'वाय' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होती.
मुक्ताचे हे फोटो वास्तविक प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफर शशांक साने यांनी पोस्ट केले आहेत. मुक्ताने ते रिपोस्ट केले आहेत.