आज देशभरात मदर्स डे 2022 साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर करत सुंदर पोस्ट लिहीत आहेत.
यामध्ये काही कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या आईसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचादेखील समावेश आहे. ही अभिनेत्री मुळात एक कॉमेडियन आहे. आत्तापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की या फोटोत दिसणारी ही चिमुकली कोण आहे?
तुम्हाला अजूनही ओळखलं नसेल तर, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या फोटोमध्ये आपल्या आईसोबत दिसणारी ही चिमुकली दुसरी कुणी नसून श्रेया बुगडे आहे.
श्रेया बुगडेने खास 'मदर्स डे' चं निमित्त साधत आपल्या आईसोबतचा हा फोटो शेअर केला आहे.
आपल्या विनोदाने हसवून लोटपोट करणारी कॉमेडी क्वीन म्हणजे श्रेया बुगडे होय. ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून श्रेया घराघरात पोहोचली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ मधून श्रेयाने सर्वांच्या मनावर गारुड घातलं आहे. सर्व पुरुष मंडळी असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ती एकमेव महिला कलाकार होती. मात्र ती यासर्व कलाकरांना बरोबरीने टक्कर देत होती. आपल्या कॉमेडी टायमिंगने श्रेयाने चाहत्यांना वेड लावलं आहे.