अभिनेत्री सोनम कपूर सध्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक (Sonam Kapoor Pregnancy) आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या ती तिची पहिली प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने 21 मार्च ती आई होणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, अभिनेत्रीचे आणखी एक नवीन मॅटर्निटी फोटोशूट समोर आले आहे, ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:-@sonamkapoor/इन्स्टाग्राम)
लवकरच आई होणार्या सोनम कपूरने ही Good News शेअर केल्यानंतर ती एकामागून एक फोटोशूट करत आहे. तिचे लेटेस्ट फोटोशूटही चाहत्यांना आवडत आहे (फोटो सौजन्य @sonamkapoor/Instagram)
सोनमने सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर हाउस ऑफ पिक्सल्सने क्लिक केलेला हे जबरदस्त फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाचे कफ्तान परिधान केले आहे. (फोटो सौजन्य:-@sonamkapoor/इन्स्टाग्राम)
या लुकमध्ये तिने गोल्डन झुमके आणि हलकासा मेकअप केला आहे. डोळ्यांचा मेकअप उठावदार केला असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो देखील पाहायला मिळतो आहे. (फोटो सौजन्य- @sonamkapoor/ इन्स्टाग्राम)
सोनमने या फोटोशूटच्या लुकसाठी हाय हील्सचा वापर केला आहे. प्रेग्नन्सीच्या काळातही तिने हायहील्स आत्मविश्वासाने कॅरी केले आहेत.(फोटो सौजन्य- @sonamkapoor/ इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये सोनम कपूरने असे कॅप्शन दिले आहे की, Kaftan life with my . या फोटोमध्ये तिने तिचा पती आनंद अहूजा, आई सुनीता कपूर, बहीण रिया कपूर यांनाही टॅग केले आहे. (फोटो सौजन्य:-@sonamkapoor/इन्स्टाग्राम)
सोनमच्या या फोटोशूटवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. आणि या स्टायलिश 'टू बी मॉम' चं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य:-@sonamkapoor/इ्ंस्टाग्राम)
याआधीही सोनमने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. एका फोटोशूटमध्ये तिने पतीसह बेबी बंप फ्लॉंट केला होता. तर या फोटोशूटमध्ये सोनम रॉयल दिसक आहे. सोनम तिच्या लग्नाच्या चार वर्षानंतर आई होणार आहे. 2018 मध्ये सोनम-आनंदचे लग्न झाले होते, लग्नानंतर सोनम लंडनला शिफ्ट झाली आहे (फोटो साभार:-@sonamkapoor/इ्ंस्टाग्राम)