यंदा 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन अमेरिकेतील ल्युईसियाना राज्यातील न्यू ऑर्लीयन्स शहरात करण्यात आलं होतं.
नुकतंच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा अमेरिकेच्या आर बॉनी ग्रॅबियलने मिस युनिव्हर्सचा 'किताब पटकवत ताज आपल्या डोक्यावर परिधान केला.
जगभरातील तब्बल 84 स्पर्धकांना मात देत बॉनीने मिस युनिव्हर्स किताबावर आपलं नाव कोरलं आहे.
मात्र यंदा भारताच्या दिविता रायने निराशा केली. दिविताने टॉप 16 मध्ये तर स्थान मिळवलं परंतु टॉप 5 मध्ये ती बाहेर पडली.
भारताची माजी मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूने बॉनीला मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला.
यावेळी मिस युनिव्हर्स बॉनी भावुक झालेली दिसून आली.
दरम्यान कॉस्च्युम राउन्डमध्ये 'सोने के चिडिया' बनून दिविताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
मात्र दिविता ज्या प्रकारे या स्पर्धेत आत्मविश्वासाने लढली त्यासाठी देशभरात तिचं कौतुक केलं जात आहे.