'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'जय मल्हार' या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर होय.
सध्या अभिनेत्री बहुचर्चित 'शेर शिवराज' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
'शेर शिवराज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटात अभिनेत्री ईशा केसकरने 'सईबाई' यांची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री विविध हटके लुकमध्ये दिसून येत आहे.
अभिनेत्रीने आपले खास फोटो शेअर करत त्याला 'फ्युजन' असं कॅप्शन दिलं आहे.
ईशा सध्या 'पावनखिंड' फेम अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा लागून आहे.