'माझी तुझी रेशीमगाठ' फेम नेहा अर्थातच प्रार्थना बेहेरे नेहमीच आपल्या लुक्सने सर्वांचं लक्ष वेधत असते.
आजही अभिनेत्रीने असंच काहीसं केलं आहे. आज वेस्टर्न नव्हे तर चक्क साडीमध्ये प्रार्थनाने सर्वांना घायाळ केलं आहे.
नुकतंच प्रार्थना बेहेरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्रार्थना व्हाईट सारी आणि ग्रीन ब्लाऊजमध्ये फारच खुलून दिसत आहे.
इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने हातात हिरव्या रंगाचा चुडादेखील घातला आहे.
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच, चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरवात केली आहे.
प्रार्थना सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मध्ये नेहाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
सोबतच प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.