NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मसाबा गुप्ताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वजन कमी करण्यासाठी दिल्या 5 टिप्स

मसाबा गुप्ताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वजन कमी करण्यासाठी दिल्या 5 टिप्स

या टिप्स फॉलो करा तुमचं वजन 100 टक्के कमी होईल; अभिनेत्री म्हसाबा गुप्ताचा दावा

16

लॉकडाउनमुळं वजन आणि नैराश्य वाढतंय अशी तक्रार गेल्या वर्षभरात अनेकांनी केली. अर्थात ही तक्रार काही अंशी योग्यच होती. परंतु काही सेलिब्रिटींनी मात्र लॉकडाउनचा वापर खूप चांगल्या प्रकारे केला.

26

त्यांनी आपल्या बेशिस्त आयुष्यात थोडीशी शिस्त आणली. परिणामी त्यांना आता आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवत आहेत. असाच काहीसा बदल अभिनेत्री, फॅशन डिझायनर म्हसाबा गुप्ता हिनं केला आहे.

36

म्हसाबा ही अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आहे. नीना या बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. मात्र त्यांची मुलगी थोडी लठ्ठ असल्यामुळं अनेकदा तिची खिल्ली उडवली जायची.

46

आता मात्र म्हसाबानं या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिनं लॉकडाउनचा सदुपयोग करत जवळपास 25 किलो वजन कमी केलं आहे. तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

56

ती दररोज दोन तास व्यायाम करते. एक तास चालते. बाहेरचं खाणं तिनं पुर्णपणे बंद केलं आहे. शिवाय तळलेले पदार्थ देखील ती खात नाही. भरपूर पाणी पिते आणि दररोज आठ तास झोप घेते. या सवयीमुळं तिचं वजन कमी झालं आहे.

66

ज्या लोकांना खरंच आपलं वजन कमी करायचं आहे. त्यांनी वरील टीप्स फॉलो करा. तुमचं वजन 100 टक्के कमी होईल असा दावा म्हसाबानं केला आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :