'होणार सून मी या घरची' मालिकेतून जान्हवीच्या रुपात अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहचली आहे.
या मालिकेपासूनचं तिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.
नुकताच तेजश्री 'अग्गबाई सासूबाई' मध्ये झळकली होती.
यामधील तिची शुभ्राची भूमिका देखील खुपचं लोकप्रिय ठरली आहे.
नुकताच तेजश्रीने महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब पटकवला आहे.
तेजश्रीने यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे सोडत हा किताब आपल्या नावावर केला आहे.
तेजश्रीने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.
तसेच तेजश्रीने 'ती सध्या काय करते' या चित्रपटा देखील काम केलं आहे.
इतकचं नव्हे तर तेजश्रीने आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटात लीप लॉकसुद्धा दिला आहे.
तेजश्रीने अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केल होतं.
मात्र एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आहे.