मराठी मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मालिकांमध्ये दररोज येणारे ट्विस्ट आणि टर्न्स यामुळे प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. या आठवड्यात कोणत्या मालिकेने प्रेक्षकांचं सर्वात जास्त मनोरंजन करून पहिल्या स्थानावर बाजी मारली आणि कोणती मालिका टॉप 10 मधून बाहेर झाली आहे, हे आपण जाणून घेऊया.
या आठवड्यात सकाळ सन्मान हा सोहळा दहाव्या स्थानावर आहे.
स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सध्या नवव्या स्थानावर आहे.
स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' ही मालिका आठव्या स्थानावर आली आहे. तर 'मुलगी झाली हो'ही मालिका टॉप 10 मधून बाहेर झाली आहे.
मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे.
अप्पू आणि शशांकमध्ये वाढत असलेल्या गोड केमिस्ट्रीमुळे 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या स्थानावर आहे.
तर नव्याने सुरु झालेली 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर आली आहे.
तर या आठवड्यात 'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
'आई कुठे काय करते' ही मालिका आजही दुसऱ्या स्थानावर आहे.
तर गेल्या अनेक आठवड्यांपासून 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या स्थानावर कायम आहे.