मराठी मालिका चांगल्याच चर्चेत आहेत. मालिकांमधून समोर आलेले नवनवीन विषय आणि कलाकार यामुळे मालिकांमध्ये प्रेक्षकांचा रस अधिकच वाढला आहे. दरम्यान या आठवड्यात कोणत्या मालिकेने बाजी मारत पहिलं स्थान पटकावलं आहे जाणून घेऊया.
'मुलगी झाली हो' या मालिकेला मागे टाकत 'मन उडू उडू झालं' ही मालिका आता टॉप 10 मध्ये पोहोचली आहे.
या आठवड्यात नवव्या क्रमांकावरसुद्धा 'सहकुटुंब सहपरिवार' आहे. कारण या मालिकेच्या जेजुरी महाएपिसोडला चांगली टीआरपी मिळाली होती.
या आठवड्याच्या टीआरपी रेसमध्ये आठव्या स्थानावर आहे स्टार प्रवाहवरील मालिका 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा'.
यश आणि नेहाच्या लग्नाच्या ट्विस्टमुळे 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या स्थानावर आली आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने सहावा क्रमांक पटकावला आहे. अप्पू आणि शशांकची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडत आहे.
नव्याने सुरु झालेली मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' सध्या पाचव्या स्थानावर आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर आहे.
'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
रंग माझा वेगळा' ही मालिका या आठवड्यात पुन्हा पहिल्या स्थानावर आली आहे.