मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
वंदना यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे.
वंदना गुप्ते या सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय असतात.
नुकतंच त्यांनी आपलेकाही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची जोरदार चर्चा होत आहे.
वंदना गुप्ते यांनी वयाच्या ७० व्या वर्षी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.
वंदना गुप्ते आणि पती शिरीष गुप्ते यांनी नुकतंच आपल्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला.
या शुभ मुहूर्तावर या दाम्पत्याने पुन्हा एकदा एकमेकांना वरमाला घालत लग्न केलं आहे.
वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यावेळी भावुक झालेले दिसून आले.