मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तेजश्री फारच क्युट दिसत आहे. तेजश्रीने जम्प सूट आणि त्यावर ब्ल्यू कलरचा लॉन्ग डेनिम जॅकेट घातला आहे.
तेजश्री प्रधानचा हा लुक फारच कूल दिसत आहे. काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोंना 14 हजारांच्यावर लाईक्स मिळाले आहेत.
तेजश्री प्रधान काही दिवसांपूर्वी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत झळकली होती. परंतु यामध्ये तिने सहाय्यक व्यक्तीरेखेच्या रूपात एन्ट्री घेतली होती.
चाहते तिला पुन्हा एकदा चांगल्या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
तेजश्री शेवटचं 'अग्ग बाई सासूबाई' या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती
तेजश्री प्रधान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत नवनवीन पोस्ट करून चाहत्यांचं लक्ष वेधत असते.
अभिनेत्री सध्या निसर्गाच्या सानिध्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.