अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची मुख्य भूमिका असलेली वेबसिरीज 'रानबाजार'ने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
जेव्हापासून या वेबसिरीजचा (RaanBaazaar Trailer) ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या अभिनेत्रींचा बोल्ड लुक चर्चेत आला आहे.
यामध्ये टॉम बॉय हेअर कट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या तेजस्विनीनेसुद्धा सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
या वेबसीरिजमधील तेजस्विनीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.
इतकंच नव्हे तर तेजस्विनी पंडित सध्या ट्विटरवर ट्रेंडदेखील करत आहे.
ट्रेलर पाहून अनेक नेटकऱ्यांनी तेजस्विनीला तिच्या बोल्ड लुक वरुन ट्रोलदेखील केलं होतं.
त्यांनतर अभिनेत्रींच्या आईने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहीत सर्वांचाच समाचार घेतला होता.