मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या लुकने सर्वांना घायाळ करते. अभिनेत्रीने नुकताच आपले काही खास फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये तिचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये सोनाली अगदी आगळ्यावेगळ्या लुकमध्ये दसून येत आहे.
आपल्या नव्या फोटोंमध्ये सोनालीने प्रिंटेड शोर्ट ड्रेस परिधान केला आहे, आणि त्या वेस्टर्न ड्रेसवर तिने चक्क मराठमोळी नथ आणि बांगड्यासुद्धा घातल्या आहेत.
मराठमोळ्या अप्सरेचा हा हटके लुक सर्वांनाचंच लक्ष वेधून घेत आहे. सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत.
सोनालीने नुकताच दुबईस्थित कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर सोनाली सतत विदेश दौऱ्यावर दिसून येत आहे.
विशेष म्हणजे लॉकडाऊन दरम्यान सोनालीने मोठ्या प्रमाणात आपलं वजनदेखील घटवलं आहे. त्यामुळे ती आधीपेक्षाही खूपच सुंदर आणि फिट दिसत आहे.