मराठीतील क्युट कपल असलेल्या शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली आहे.
त्यांनतर ते सतत आपले रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.
नुकतंच शिवानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराजससोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे लव्हबर्ड्स समुद्रकिनाऱ्यावर असलेले दिसून येत आहेत.
या दोघांनी सोशल मीडियावर आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलं होतं.
त्यांनतर त्यांनी लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.