नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटात रिंकू राजगुरू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
झुंड सिनेमातील आर्चीचा लुक सध्ये सोशल मीडियावर चर्चेत आहे. झुंड या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये रिंकूची झलकही पाहायला मिळतेय.
रिंकू राजगुरूने तिचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, नमस्ते मेरा नाम है मोनिका. तिच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
झुंड या सिनेमात रिंकू मोनिकाची भूमिका साकारताना दिसते. तिचा हा झुंडमधील लुक काहीसा खेड्यातील तरूणींशी मिळणार आहे. काहीशी सावळी ...उन्हाची झळा सोसलेली अशी काहीशी रिंकू या लुकमध्ये दिसत आहे.
या लुकमधील रिंकुचे कपडे असतील किंवा तिच्या माथ्यावरील गोंदन लक्षवेधून घेत आहे.
झुंड हा नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी चित्रपट असून यामध्ये अमिताभ बच्चन यांची देखील प्रमुख भूमिका आहे.
झुंडमध्ये रिंकूसोबत सैराटमध्ये परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसरही दिसणार आहे.
Rinku Rajguru