प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. हटके फोटोशूटनं ती नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते.
कधी नऊवारी तर कधी साडीत तर कधी वेस्टर्न ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी फोटोशूट करत असते.
कपडे कुठलेही असो प्राजक्ता माळी नेहमीच सुंदर दिसते.
प्राजक्ताच्या फोटोशूट इतकीच तिच्या फोटो कॅप्शनची देखील चर्चा होताना दिसते. तिचं हे नवं फोटोशूट पाहून चाबत्यांनी तर कमेंटचा पाऊसच पाडला आहे.
कुणी तिला तू खूप सुंदर दिसतेस असं म्हटलंय तर कुणी रेड हार्ट इमोजी पोस्ट करत प्राजक्ताच्या लूकचं कौतुक केलं आहे.
प्राजक्तानं देखील या फोटोशूटला भन्नाट कॅप्शन दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, 'देखा जो तुमको ये..दिल को क्या हुआ है । मेरी धड़कनों पे ये.. छाया क्या नशा है।'
ब्राऊन रंगाच्या साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
एकापेक्षा एक अशा पोझ प्राजक्ता माळी देताना दिसत आहे.