'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या’या गाण्यांमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.
मानसीने तिच्या तिच्या सौंदर्यानं, नृत्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मानसीच्या सौदर्यामुळे तिची तुलना ऐश्वर्या रायशीही केली जाते. तिला मराठीतील ऐश्वर्या राय म्हटलं जातं.
मानसी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मानसीनं नुकतंच नवं फोटोशूट केलं असून हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मानसीने फोटो शेअर करत लिहिलं, 'जानेवारी आपल्याला स्वप्न दाखवते आणि डिसेंबर आरसा'
मानसीचे हे फोटो आणि कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगलीये.
दरम्यान, मानसी तिचा नवरा प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते काहीसे नाराज आहेत.