अभिनेत्री अमृता खानविलकर सतत सोशल मीडियावर आपले नवनवीन लुक शेअर करत चाहत्यांच लक्ष वेधत असते.
आजही अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना भुरळ घातली आहे.
अमृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसून येत आहे. पांढरी साडी आणि लाल रंगाच्या फुल स्लिव्ह्ज ब्लाउजमध्ये ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.
या चंद्र्मुखीला पाहून चाहते विविध कमेंट्स करत आहेत. काहींनी कमेंट्स करत म्हंटलय, 'अशी सुंदरी दुसरी नाही'
अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
अभिनेत्री नुकतंच आपल्या 'चंद्रमुखी' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती.
या चित्रपटात ती अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत झळकली होती.