फिटनेस फ्रिक सोनाली खरेचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी सोशल मिडीयावर सोनालीला वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांकडून शुभेच्छा मिळाल्या.
मात्र या सगळ्यात तिचा वाढदिवस खास बनवला ती तिची जवळची मैत्रिण अमृता खानविलकरने. अमृताने तिच्या इन्स्टा स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोनाली खरे आणि अमृता खऱेची मैत्री जगजाहीर आहे. मग काय आपल्या जिवलक मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हटल्यावर अमृताने सोनालीला खास सरप्राईज द्यायचे ठरवले.
रात्री सोनाली झोपली असताना तिच्या या खास मैत्रिणीने केक आणून तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
अमृताने सोनालीच्या वाढदिवसासाठी रात्री केक आणला तिला खास सरप्राईज दिले. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो, व्हिडिओ सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. ज्यात सोनाली अमृतासोबत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसतेय.
अमृता आणि सोनाली या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्रिणी आहेत. अनेकवेळा त्या एकत्र दिसतात.
सोशल मीडियावर देखील त्या एकमेंकीसोबत अनेक डान्सा व्हिडिओ शेअर करत असतात.