मराठी अभिनेता गश्मीर महाजनीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पाहूया त्याचा एक मजेशीर किस्सा
गश्मीरने आपल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या एका विचित्र प्रपोजल बद्दल सांगितल होतं.
गश्मीर मराठी चित्रपटसृष्टीतील एक हँडसम हंक समजला जातो. लाखो तरुणी त्याच्यावर फिदा आहेत.
एका जाहिरातीच्या शुटींगसाठी गश्मीर नागपूरला गेला होता.
आणि नेमकं त्याचवेळी व्हॅलेंटाईन डे होता.
गश्मीर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता. त्या रूममध्ये त्याला एक कॉल आलला होता.
त्या कॉलवरून त्याला रुमच्या बाहेर येण्यास सांगितलं होतं.
गश्मीर जेव्हा बाहेर आला त्याला बघून एकदम धक्काच बसला, कारण पूर्ण कॉरिडोअर फुलांच्या गुच्छांनी भरून गेलं होतं.
आणि अचानक एका मुलीने समोर येत गश्मीरला प्रपोज केल होतं, ती मुलगी त्या हॉटेलची जीएच होती.
ती सर्व फुले बघून गश्मीरला एका क्षणासाठी काश्मीरसुद्धा आठवलं होतं.