मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि दिग्दर्शक प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी काल मुंबईत लग्नगाठ बांधली.
हा लग्नसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला. यावेळी दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता.
लग्नाच्या काही वेळेतच हृता आणि प्रतीकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या या खास क्षणाचे फोटो शेअर केले आहेत.
हृता आणि प्रतीक अगदी पारंपरिक वेशभूषेत फारच सुंदर दिसत आहेत.
यावेळी हृताने पिवळ्या रंगाची आणि लाल काठ असलेली कांचीपुरम साडीची निवड केली आहे. तर प्रतीकने व्हाईट शेरवानी परिधान केली आहे.
या लग्नाला हृताच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' नाटकाचे सहकलाकार आणि निर्माती उमेश कामत आणि प्रिया बापट उपस्थित होते. शिवाय मन उडू उडू झालं मालिकेचे कलाकारसुद्धा उपस्थित होते.
हृता आणि प्रतीकने गुपचूप लग्न उरकत सर्वांनाच चकित केलं आहे.
या दोघांनी गेल्यावर्षी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता.